Breaking News

शेलू रेल्वेस्थानकात भिंती बोलू लागल्या..!, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रंगरंगोटी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शेलू स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रेल्वे स्थानकाच्या भिंती वेगवेगळ्या रंगाने रंगवल्या आहेत. त्यामुळे या स्थानकात रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले आहे. शेलू रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खुश आहेत.

शेलू परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे मागील काही वर्षात हे रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीचे ठिकाण बनले आहे. 10 वर्षांपूर्वी या भागात एक अभियांत्रिकी महाविद्यालय आले आहे. या रेल्वे स्थानकातून सकाळी मुंबई गाठणार्‍या प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. येथील वाढलेला महसूल लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने शेलू स्थानकात अनेक कामे सुरू आहेत. त्यात दोन पादचारी पूल, निवारा शेड या पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. दरम्यान, येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्थानकाचा  परिसर आनंददायी बनविण्याचा निर्णय घेतला. स्थानकाच्या भिंती दगडाच्या असून त्यावर रेल्वेकडून कधीतरी रंगरंगोटी केली जाते. आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या परवानगीने शेलू स्थानकातील भिंतीं वेगवेगळ्या रंगांनी सजवल्या.त्यात भिंतींवर दगड कोरून त्यात रंग भरले, काही ठिकाणी फुले काढली तर काही ठिकाणी आकर्षक वाटतील अशी चित्रे काढली. त्यामुळे या भिंती आकर्षक व बोलक्या बनल्या आहेत.

पूर्वी आमच्या शेलू रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍यांची संख्या कमी होती, मात्र परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय आले आणि तेथील विद्यार्थ्यांमुळे आमचे स्थानक रंगीबेरंगी आणि आकर्षक बनले आहे.

-अ‍ॅड. सूर्यकांत मसणे, प्रवासी, शेलू, ता. कर्जत

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply