Breaking News

फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (दि. 22) व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी कलम 370वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.

आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना शहा यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर कायम ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले. राज्यात गुंतवणूक, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी राज्याला पुढे आणले, असे म्हणत शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस हाच राज्यातील भाजपचा चेहरा असल्याचे अधोरेखित केले.

कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुम्ही विरोध करता की समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांना स्पष्ट सांगावे, असे आव्हान शहा यांनी या वेळी दिले. बांगलादेश युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. अशा मुद्द्यांमध्ये राजकारण आणता कामा नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र कलम 370 हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणले, अशी टीका करून 5 ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चाललेली नाही याकडेही शहा यांनी लक्ष वेधले.

राज्यातील जनता भ्रष्टवादी काँग्रेस पक्षाच्या मागे कधीही जाणार नसल्याचे सांगत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्याच वेळी घराघरात जाऊन कलम 370 काय आहे हे जनतेला समजावून सांगावे, असे आवाहन शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply