Breaking News

उरण शहरात बेशिस्त वाहनांवर कारवाई

उरण ः वार्ताहर

उरण शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असून, या वाहतूक कोंडीमुळे बाहेरून शहरात येणार्‍या तसेच उरणवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी त्यांच्या वाहतूक पोलीस पथकासह उरणमध्ये बेशिस्त वाहन चालविणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलीस नायक तुकाराम ढमाले, पोलीस निलेश घरत, वार्डन किरण जोशी या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या आधिपत्याखाली उरण शहरात ही कारवाई सुरू केली आहे. उरण शहरातील सर्वच रस्त्यांवर बेशिस्त पद्धतीने उभी करण्यात येणारी वाहने यांना समज देण्याबाबत, रिक्षांचे स्टण्ड निश्चित करणे, शहरात येणारी वाहने उरणमधील नियोजित ठिकाणी पार्किंग करण्याच्या सूचना आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नियोजनबध्द, वन-वे मार्गिका ठरविण्याबाबत महत्वपूर्वक बैठक घेण्यात येणार असून गणपती सणाच्या अगोदरच उरण शहरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बैठक बोलवली जाईल, असे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply