Breaking News

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दाखल्यांचे वाटप

मुरूड तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांना लाभ; कर्मचार्‍यांनी भाग घेण्याचे आवाहन

मुरुड : प्रतिनिधी

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यात विविध प्रकाराच्या 3204 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी लागणारे दाखले वाटपाचे काम शासनाचे आहे, मात्र हे काम प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करीत आहे. म्हणूनच सर्व शासकीय कर्मचार्‍यांनी प्रतिष्ठानच्या कार्यात हिरहिरीने भाग घेण्याची गरज असल्याचे मत तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.  मुरुड नगर परिषद सभागृहात झालेल्या या दाखले वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदस्य उदय दांडेकर यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रे, विद्यार्थ्यांना रहिवासी व जातीचे दाखले मिळून संपुर्ण तालुक्यात 3204 दाखले वितरीत करण्यात आले. मुरुड नगर परिषदेला केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाच कोटींचे पारितोषिक मिळवले आहे. या पुरस्कारामध्ये श्री सदस्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे  नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले. नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी केले. नायब तहसिलदार प्रज्ञा काकडे, नगर परिषदेच्या पर्यटन व नियोजन समितीचे सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेविका मुग्धा जोशी, युगा ठाकूर, जंजिरा विद्यामंडळ अध्यक्ष सुधाकर दांडेकर, उदय दांडेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन मुंबईकर यांनी आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply