Breaking News

पनवेलमध्ये आमदार चषक किकबॉक्सिंग स्पर्धा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त किकबॉक्सिंग 2019 आमदार चषकाचे आयोजन रविवारी (दि. 4) करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्या स्पर्धकांचा सत्कार केला.

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड किकबॉक्सिंग असोशिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोशिएशनच्या वतीने किकबॉक्सिंग 2019 आमदार चषक आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल तालुका युवा सरचिटणीस महेश पाटील, आनंद ढवळे, पनवेल उपाध्यक्ष प्रशांत गांगारडे, आर.के.ए. अध्यक्ष मंदार पनवेलकर, युवानेता राजेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply