पेण : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने सोमवारी काश्मीरमधील 370 कलम हटवून ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयाचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या कोतवाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, सुहास पाटील, भाजप तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, विस्तारक पंकज शहा, भास्कर पाटील, ज्येष्ठ नेते बापुसाहेब साठे, बाळासाहेब जोशी, प्रमोद मंडलिक, अनिल डेरे, शांता भावे, डॉ. द्वारकानाथ शहासने, भरत साळवी, हितेश पाटील, विकास गोरी, गणेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. त्यानंतर संपूर्ण पेण शहरात रॅली काढण्यात आली. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बापुसाहेब साठे आणि अनिल डेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खोपोली : प्रतिनिधी
काश्मीरमधील 370 कलम काढून व काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे खोपोलीतील सर्वपक्षीय नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी व विविध पक्षीय नेत्यांनी जोरदार स्वागत केले. खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक किशोर पानसरे, मोहन औसरमल, तुकाराम साबळे, मनेश यादव, अमोल जाधव, केविना गायकवाड, प्रमिला सुर्वे, विनिता कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रवी रोकडे, कैलास गायकवाड, शहर अभियंता दीपक जाधव यांच्यासह नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.