Breaking News

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा व द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन

उरण : रामप्रहर वृत्त

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने उरणमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि रायगड जिल्हास्तरीय 19वी द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3500हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात, तर द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉनचे उद्घाटन 11 ऑगस्टला सकाळी 8 वा. नवीन शेवा रोड येथे होणार आहे. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासाठी खास उरण अभिमान दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून 16 संघांनी; तर शालेय फुटबॉलसाठी आठ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply