Breaking News

भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळावा मंगळवारी (दि. 6) भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये झाला.

या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा

संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार देवेंद्र साटम, संघटन मंत्री सतीश धोंड, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पनवेल-उरण विधानसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी शक्तिकेंद्र प्रमुखांना मार्गदर्शन केले.

– वरिष्ठांचे मार्गदर्शन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना बळकट करण्यावर भाजपचा भर आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळत आहे. याच अनुषंगाने पनवेलमध्ये शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळावा झाला. त्यास जबरदस्त असा प्रतिसाद लाभला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply