Breaking News

आरोग्यम् धन संपदा!

निवडणुका आल्या की मतदारराजा आरोग्यम् धन संपदा, असे म्हणत अनेक राजकीय नेते आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. त्यानंतर पुन्हा निवडणुका

येईपर्यंत काही नाही हे आपण नेहमीच अनुभवत असतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र गेली 12 वर्षे सातत्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते. रविवारी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 12वे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात 8500 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे वाचायला सोपे वाटते, पण शिबिर यशस्वी होण्यासाठी अनेक दिवस घेण्यात आलेली मेहनत आणि त्यामागील कष्ट कधी दिसण्यात येत नाही. म्हणूनच ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना सांगितले की, सामाजिक भावनेतून एखादे शिबिर घेतले जाते, पण तब्बल 12 वर्षे आरोग्य महाशिबिर घेणे निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वारसा आमदार प्रशांत ठाकूर चालवत असताना ते आणि त्यांचे सहकारी गोरगरीब लोकांच्या आरोग्याची घेत असलेली काळजी पाहून ‘अब की बार एक लाख पार’ असा निकाल पनवेल विधानसभा मतदारसंघात लागेल, असा विश्वासही ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. 

सामाजिक कार्य करताना सतत 12 वर्षे अशा प्रकारचे शिबिर घेणे ही सोपी गोष्ट नसते. एखादा उपक्रम राबवताना काय होते याचा अनुभव ज्यांनी घेतला असेल  त्यांनाच सतत 12 वर्षे आयोजित करण्यात येणार्‍या आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिराचे महत्त्व लक्षात येऊ शकते. या वर्षी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असणार्‍या या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा 350हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, कान व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह नेत्रतपासणी व चष्मेवाटपही करण्यात आले. त्याचबरोबर ईसीजी तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. 

तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच रुग्णांसाठी न्याहारी, भोजन, वाहतूक आदी चोख व्यवस्था करण्यात येऊन  रुग्णांच्या सेवेसाठी सुकाणू, स्वागत, डॉक्टर व वैद्यकीय आणि रुग्ण सहाय्यक समिती, परिवहन, भोजन, औषधे वाटप अशा 24 समित्या तसेच वैद्यकीय तज्ञ, स्वयंसेवक सज्ज होते. शनिवारी रात्रीपासून पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक भागांत पुराचे पाणी आले होते. त्यामुळे रस्ते बंद झाले. काहींच्या घरात पाणी शिरल्याने शिबिराला गर्दी होईल की नाही याबाबत शंका वाटत होती, पण रविवारी जोरदार पाऊस असतानाही सकाळी 8 वाजल्यापासूनच लोकांनी गर्दी केली होती. दुपारी 2

वाजेपर्यंत वेळ असताना त्यानंतरही लोक येत होते. साडेआठ हजार लोकांनी उपस्थित राहून या महाआरोग्य शिबिराचा लाभ तर घेतलाच, पण आयोजकांनी केलेल्या सोयीचे कौतुकही केले.   पनवेल तालुक्यातील खेड्यापाड्यातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरील विश्वासाने लोक आले होते. केळवणे येथील नामू पाटील आणि त्यांच्या पत्नीने सांगितले की, आम्ही दोन-तीन वर्षे या आरोग्य शिबिराला येतो. सकाळी आठ वाजता घरातून निघालो, पण पावसामुळे गाडी उशिरा आली. त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला.आम्हाला वाटले होते आता आपली तपासणी होणार नाही, पण येथे आल्यावर आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. नोंदणी झाल्यावर स्वयंसेवक आम्हाला तपासणी सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत घेऊन आला. त्यामुळे शोधाशोध करावी लागली नाही. डॉक्टरांनी तपासणी करून औषधे दिल्याने खूप समाधान वाटले. 

रत्ना पाटील या पहिल्यांदाच शिबिराला आल्या होत्या. येथील व्यवस्था पाहून त्या भारावून गेल्या. पावसात भिजून आलेल्यांना आल्यावर दिला जाणारा गरमागरम चहा, नाष्टा, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी मदतीला धावून येणारे स्वयंसेवक यामुळे वृद्ध, महिला आणि रुग्णांना कोणताही त्रास सहन करावा लागत नव्हता. अनेक वेळा शिबिरात आलेल्या लोकांची तपासणी व्यवस्थित न करताच डॉक्टर औषधे लिहून देत असतात, पण या ठिकाणी आपुलकीने चौकशी करून व्यवस्थित तपासणी करून औषधे दिली जात होती. त्यानंतर शिबिराला आलेल्या लोकांसाठी जेवणाची सोयही चांगली केली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

शिबिर संपताना एका व्यक्तीच्या पायाला बाहेर गेल्यावर लागले. स्वयंसेवक त्याला घेऊन आले. त्यावेळी हाडाचे स्पेशालिस्ट डॉक्टर गेले होते. डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी त्यांना फोन करून सांगताच ते पुन्हा आले. त्यांनी त्या व्यक्तीची तपासणी करून औषधे दिली. अशा प्रकारची सेवा डॉक्टर मंडळी ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळेच देताना दिसतात. नाहीतर इतर ठिकाणी शिबिरात डॉक्टर एक सहल म्हणून मजा करायला आलेले आपल्याला दिसतात. त्यामुळेच या शिबिराचे

वेगळेपण आपल्याला दिसते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply