Breaking News

उलवा विद्यालयाची वर्षासहल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयाची शैक्षणिक वर्षासहल नुकतीच लांगेश्वर, मोरावे येथे झाली. सहशालेय उपक्रमांतर्गत या वर्षासहलीचे आयोजन सहलप्रमुख बी. आर. चौधरी यांनी मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. गुरुकुल प्रकल्प प्रमुख व्ही. जी. पाटील यांनी सर्व नियोजन केले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर आणि मुख्याध्यापक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परिसरातील वनस्पती आणि खार्‍या पाण्यातील परिसंस्थेचा अभ्यास केला. व्ही. जी. पाटील यांनी खारफुटी वनस्पतीची पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या सहलीच्या माध्यमातून शैक्षणिक अनुभव घेतला. सहल यशस्वी होण्यासाठी एस. डी. पाटील, व्ही. व्ही. गावंड, एस. आर. गावंड आदी शिक्षकांनी सहकार्य केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply