Breaking News

शिरवली ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले

भाजपच्या रखमाबाई बोंडे सरपंचपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून दणदणीत विजय साकारला आहे. शिरवलीत भाजपच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, तसेच सदस्यपदाच्या आठ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला.

शिरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 25) जाहीर झाला. या ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे विजयी झाल्या असून, परशुराम रिकामे, भाऊदास सिनारे व नंदा पाटील बिनविरोध; तर लीलाबाई चोरघे, अशोक पाटील, इंदूबाई आवाटी, पदूबाई निरगुडा, गिरिजाबाई रंधवी विजयी झाल्या आहेत. 

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकत 10 वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेकापची सत्ता उलथवण्याचे काम येथील भाजप कार्यकर्त्यांनी केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून, ग्रामपंचायतीमधील विजयामुळे विकासचक्र यापुढेही असेच सुरू राहणार आहे.

विजयी उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, गौरव भोईर, भालचंद्र सिनारे, अशोक साळुंखे, तुकाराम पाटील, शेखर शेळके यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

रायगडात भरारी

रायगड जिल्ह्यात पूर्वी जेमतेम अस्तित्व असलेल्या भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद दाखवून दिली आहे. पनवेलमधील शिरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. शेजारील उरणमध्येही भाजप युतीने बाजी मारली. याशिवाय पेण तालुक्यातील वढाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप व मित्रपक्षांनी परिवर्तन घडवून आणले आहे; तर जिल्ह्याचा दक्षिण भाग असलेल्या महाड तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये ‘कमळ’ फुलले आहे. एकूणच भाजपने क्षमता सिद्ध केली.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply