पनवेल : प्रतिनिधी
अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम नाईक, सलमा खान, चित्रा भगत स्कूल कमिटीच्या सदस्या दमयंती भगत, राधाबाई चौधरी, संगीता केळकर, शालिनी ठाणगे, मिलिंद खारपाटील आदी उपस्थित होते; तर अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन रवी चोरघे होते. शालेय परीक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शाळेचा जो विद्यार्थी 95 टक्के गुण मिळावेल त्याला पाच लाख रुपये देण्याचे चोरघे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर 85, 90 टक्केहुन अधिक गुण मिळवणार्यांना मोठी बक्षिसे जाहीर केली. प्रा. फातिमा मुझावर, प्रधान कुलकर्णी, मधुकर पवार, के. एम. मालुसरे या शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या शिक्षकांना अमरदीप गौरव, अमरदीप प्रेरणा, अमरदीप जनरक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बिराजदार, प्रा. मुझावर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. पाटील आणि हर्षला पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था आणि छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.