
रेवदंडा ः वार्ताहर
साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने परिसरातील 19 राजिप शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके वाटप कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास साळाव जेएसडब्लू कंपनी सीएसआर हेड विजय कांबळे, सीएसआर विभागाच्या अर्पणा पाटील, भाग्यश्री कदम, मंगेश शेडगे व राकेश चवरकर आदीसह शाळांमधून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
साळाव जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या स्तुत्य उपक्रमातून साळाव, उर्दू शाळा साळाव, संजयनगर, चेहेर, वाघूलवाडी, आमली, येसदे, शिरगांव, वळके, सार्तिडे, ताडगांव, ताडवाडी, चोरढे, उर्दू शाळा चोरढे, सावरोली, वेताळवाडी, तळेखार, शिवगांव, कोर्लई या राजिप शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले.