कळंबोली : येथील सेक्टर 1 ई सत्यसंस्कार कॉम्प्लेक्समध्ये परी ज्वेलर्सचे उद्घाटन रविवारी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तानाजी भुषारी, मालक संदीप मुळीक, स्वप्नील मुळीक, राजेंद्र बनकर, भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण पोलीस ठाण्याकडून बकरी ईदनिमित शुभेच्छा
नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी युनायटेड चॅरीटेबल ट्रस्टला उरण पोलीस ठाण्याकडून बकरी ईदनिमित शुभेच्छा दिल्या.
अंत्यविधी सेवा संस्था सुकापूरतर्फे पूरग्रस्तांना मेडिसिन बॉक्स रवाना
नवीन पनवेल ः अंत्यविधी सेवा संस्था सुकापूरतर्फे पूरग्रस्तांना मेडिसिन बॉक्स रवाना करताना प्रदीप ठाकरे.