सीकेटीत प्रथमेश परब, मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम नवीन पनवेल येथील सीकेटी कॉलेज येथे सोमवारी (दि. 12) संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.
या कार्यक्रमात महिलांसाठी खेळ पैठणीचा, सिनेकलाकारांसोबत दिलखुलास गप्पा व कलाकारांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भाजप महिलामोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, गुलाब थवई, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, सुलोचना कल्याणकर, माजी नगरसेवीका कल्पना ठाकूर, नीता माळी, वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, अनिता रणदीवे, यांच्यासह पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास सुप्रसिद्ध सिनेकलाकार प्रथमेश परब, मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, रसिका चव्हाण, निर्मात्या अभिनेत्री अलंक्रीत राठोड यांनी उपस्थित राहून रसिकांसोबत दिलखुलास संवाद साधला. तसेच महिलांसाठी पैठणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विजयी झालेल्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अभिनेते प्रथमेश परब आणि अभिनेत्री अलंक्रीत राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.