Breaking News

आयपीएल फायनल; पंतप्रधान मोदी, शाह राहणार उपस्थित

नवी दिल्ली : आयपीएलचा 2022 स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरू संघात होत असून विजेता संघ गुजरातविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे रोजी अनेक मान्यवर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम असणार असून या वेळी सामना इतर सामन्यांच्या तुलनेत अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजता अंतिम सामना होणार आहे. आयपीएल फायनलपूर्वी एक मनोरंजनाचा कार्यक्रमही सर्वांना पाहायला मिळेल.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply