Monday , June 5 2023
Breaking News

एमबीबीएस परीक्षेत श्वेता पाटीलचे यश

नागोठणे : येथील डॉ. सुनील पाटील आणि डॉ. गीता पाटील यांची ज्येष्ठ कन्या, श्वेता पाटील हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. श्वेताने सोलापूरच्या अश्विनी रूरल वैद्यकीय महाविद्यालयात हे शिक्षण पूर्ण केले असून पदवीदान समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भरूड, संस्थेचे अध्यक्ष बिपिन पटेल, रुग्णालयाच्या डीन डॉ. माधवी रायते, विश्वस्त भारती पटेल यांच्या हस्ते नुकताच महाविद्यालयात पार पडला. डॉ. श्वेता पाटील यांचे शालेय शिक्षण येथील जे. एच. अंबानी पेट्रोकेमिकल्स विद्यालयात झाले आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply