Breaking News

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले

आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारताचे संविधान जगात अद्भूत आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.
संविधान गौरव दिन आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर नवीन पनवेलमधील के.आ. बांठिया विद्यालयात आयोजित केले होते. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
आज या संविधानाला 75 वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला पुढे जाण्याचे बळ दिले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली संविधान दिन हा देशभरात साजरा केला पाहिजे अशी संकल्पना मांडली. देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही देशाच्या विकासासाठी मोदीजींनी जे जे निर्णय घेतले त्यांना पाठिंबा दिला असल्याने आठवलेसाहेबांचेही या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात आभार व्यक्त केले तसेच संविधान दिनानिमित्त निलेश सोनावणे व सहकार्‍यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
365 दिवस ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले पनवेल शहर स्वच्छ, सुंदर ठेवणार्‍या महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य निरोगी रहावे याकरिता त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेच्या वेळी होणे गरजेचे आहे, हा संकल्प मनाशी ठेवून या शिबिराचे आयोजन केले असल्याचे निलेश सोनावणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या वेळी रिपाइंचे पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा प्रवक्ते तथा पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, आधार हॉस्पिटलचे डॉ. संतोष पांढरे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू आदींनी मनोगत व्यक्त केल.
या शिबिरास के.आ. बांठिया विद्यालयाचे प्राचार्य बी.एस. माळी, रिपाई खांदेश्वर शहराध्यक्ष दिनेश जाधव, आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिलिंद पराडकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त धावू पाटील, विजय पाटील, मुकुंद कांबळे, कल्पेश कांबळे, संदेश पाटील, मयूर गायकवाड, विकेश पाटील, दीपक भोपी, संजय कांबळे आदींसह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव विधाते, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, अनिकेत जाधव आदींचे सहकार्य लाभले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply