Breaking News

करवले गाव हद्दीतील अनधिकृत बांधकामावर पमपाची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत करण्यात करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी (दि. 23) महापालिकेने कारवाई करून पाडले. तसेच घोट गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो मोकळा करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत गोठ्याचे अनाधिकृत बांधकाम करण्यात येत होते. या बाबत माहिती मिळताच ते बांधकाम निष्कासित करणेबाबत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रभाग अधिकारी भंडारी व अधिक्षक कडू यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी 12.30 वाजता कारवाई सुरू करून जेसीबी व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या साहाय्याने अनाधिकृत गोठ्यांचे बांधकाम हटविण्यात आले. घोट गाव येथील येण्या जाण्याच्या रस्त्यात अतिक्रमण करून रस्ता स्थानिक व्यक्तीने दांडगाई करून अडविला होता. सदरचे अतिक्रमण देखील हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. ही कारवाई प्रभाग अधिकारी  दशरथ भंडारी, उपविभाग नावडेचे प्र. अधीक्षक  हरिश्चंद्र कडू, बिट निरीक्षक  संतोष सोनवणे, तळोजा पोलीस ठाणेचे पोलीस कर्मचारी, उपविभाग नावडेचे कर्मचारी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply