Breaking News

तळोजा मजकूरमध्ये होणार समाजमंदिर; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून जागेची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

तळोजा मजकूर या गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये समाज मंदिर बांधून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी (दि. 31) सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले. निवेदनाची दखल घेत परेश ठाकूर यांनी या समाज मंदिराच्या जागेची पाहणी केली. पनवेल महापलिका हद्दीतील वार्ड क्रमांक 1 मधील तळोजा मजकूर या गावातील ग्रामस्थांना सामाजिक, धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याकरीता हक्काचे समाजमंदिर नसल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्यापार्श्वभुमीवर गावामध्ये समाज मंदिर बांधण्यासंदर्भात शांतीकुटी महिला मंडळ, तळोजा मजकुर यांच्या वतीने सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोश केणी, संतोष पाटील, जगदीश घरत, विवेक केणी, जयंत घरत, सुनिल पाटील शांती कुटी महिला मंडळ अध्यक्ष शकुंतला पाटील, गुलाब पाटील, नीरा बाई पाटील, यशोदा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply