
कळंबोली ः बद्रिकेदार फाऊंडेशन कळंबोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव व सैनिक सन्मान येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डीआयजी रवींद्र रौतेला उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप बिष्ट व भूपाल बिष्ट यांनी यापुढेही असे कार्यक्रम राबविण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई शहर यांच्या वतीने रक्षाबंधन

पनवेल : महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई शहर यांच्या वतीने कळंबोली, खारघर पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना गुरुवारी महिलांनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. या वेळी समितीच्या नवी मुंबई अध्यक्ष विजया कदम, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
आवरे शाळेत वह्यावाटप

उरण ः तालुक्यातील जासई उपसरपंच अभिजित घरत यांच्या प्रेरणेतून आवरे शाळेत वह्यावाटप प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, अभिजित घरत, राणी म्हात्रे, अजित पाटील, रय्यान तुंगेकर, आशा पाटील, सुरज म्हात्रे, सुनील घरत, संतोष घरत उपस्थित होते.
साईबाबा मंदिर रस्त्यावरील ड्रेनेजच्या चेंबर परिसरात पडला खड्डा

पनवेल ः महानगर पालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांना साईबाबा मंदिर रस्त्यावरील ड्रेनेजच्या चेंबर परिसरात पडलेल्या खड्ड्याबाबतची तक्रार येताच तत्काळ त्यांनी तक्रारीचे निवारण करून तो मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून दिला आहे.
उलवा विद्यालयाची अग्निशमन केंद्रास भेट

उलवा ः रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवा विद्यालयाची क्षेत्रभेट नुकतीच उलवे नोड अग्निशमन केंद्र येथे संपन्न झाली. या क्षेत्रभेटीचे आयोजन प्रकल्पप्रमुख व्ही. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अधिकारी एम. ए. कासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष दळवी, संदीप मढवी आदी प्रशिक्षकांनी या केंद्रात दिले जाणारे प्रशिक्षण तसेच आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. ज्योती सहानी, श्रुशा गायकवाड, शालू कनोजिया, रितू सिंह आदी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून अधिक माहिती घेतली.