मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक हिलाल हलडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी गटशिक्षणाधिकारी बापू सोनावणे, रज्जाकभाई तांडेल, हिलाल हलडे, मधुकर भोईनकर, दिनारभाभी झोंबरकर, इम्तियाज तांडेल, मुख्त्यार मुजावर, सायमा उलडे, मुअज्जम दळवी, डॉ. अजय सोनावणे, हिदायत तांडेल, नवाफ सिद्दिक आदींच्या हस्ते पहिली ते आठवीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच बक्षिस देण्यात आले. यावेळी शिक्षक -पालक संघाचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा साखरकर यांनी केले.