Breaking News

‘टीपीएसडीआय’तर्फे कौशल्य प्रशिक्षण

पनवेल : वार्ताहर

टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (पीईएफ) सहयोगाने जवळपासच्या इलेक्ट्रिशिअन्सना स्किल-गॅप प्रशिक्षण पुरवत आहे. त्याचप्रमाणे रायगड व पालघर जिल्ह्यांतील या इलेक्ट्रिशिअन्सना रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगद्वारे (आरपीएल) प्रमाणित करत आहे. या भागिदारीखाली पीईएफ शहरी व ग्रामीण भागातील गरीब वस्त्यांमधून प्रशिक्षणार्थींना एकत्रित करते; तर टीपीएसडीआय त्यांना आपल्या स्किल्स-ऑन-व्हील्स या फिरत्या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देते. हे केंद्र या जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन हे प्रशिक्षण देते.

टीपीएसडीआय आपल्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 150 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि पनवेलजवळील उसर्ली गावातील 109 जणांना यापूर्वीच प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. टीपीएसडीआयच्या प्रशिक्षणात कौशल्यांसोबतच सुरक्षिततेसाठी आवश्यक पद्धती आणि घरगुती वायरिंगसाठीच्या सर्वोत्तम पद्धती यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याने प्रशिक्षणार्थींची रोजगारक्षमता यामुळे आणखी वाढते. घरगुती वायरिंग व सौरऊर्जा विभागातील बाजारपेठेनुसार चालणार्‍या, तसेच रोजगारकेंद्री कौशल्यांचे प्रशिक्षण सहज उपलब्ध करून देण्यासाठी स्किल्स-ऑन-व्हील्सची रचना करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply