
पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूल कमिटी सदस्य तथा प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढीचे व्यवस्थापक विद्याधर ताडकर, शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. ठाकूर, तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
साखरवाडी येथे वैद्यकीय आरोग्य शिबिर

सांगली ः कामोठे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे सांगली पूरग्रस्त भागात साखरवाडी येथे वैद्यकीय आरोग्य शिबिर घेण्यात आले. सुमारे 300 लोकांनी याचा लाभ घेतला. या वेळी पनवेल मनपा आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, डॉ. विजय पाटील, डॉ. हेमंत पाटील, डॉ. गणेश, डॉ. रूपेश, डॉ. जैन, डॉ. वाकचौरे, डॉ. जाधव, तसेच कामोठे असोसिएशनचे सहकारी आदी उपस्थित होते.
नगरसेविका नीता माळी यांचे रक्षाबंधन

पनवेल ः नगरसेविका नीता माळी यांनी 24 तास दक्ष असणार्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरे केले. या वेळी गुन्हे शाखा, पनवेल येथील वपोनि के. आर. पोपेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. व्ही. लाड, एस. आर. ढाले आणि कर्मचारी, तर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वपोनि विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोसे, राजेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक दीपक कादमाने, सुनील तारमळे आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
मान्सून कप 2019 फुटबॉल स्पर्धा


पनवेल ः रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रम इव्हेंट कंपनीच्या वतीने ‘मान्सून कप 2019’ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर शाळेच्या मैदानात सुरू आहे. या स्पर्धेला पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.