Breaking News

पूरबाधित जनावरांसाठी रायगडचा चारा

अलिबाग : प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून हिरव्या चार्‍याची मदत पाठविली जात आहे. चारा कापण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी श्रमदान मोहीम हाती घेतली आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी (दि. 17) एकूण 107 टन ओला चारा व पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला.

पूरग्रस्त भागात गुरांना चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता रायगड पशुसंवर्धन विभाग, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, तसेच रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग तालुक्यातील सहाण येथील 15 टन हिरवा चारा कर्मचार्‍यांनी कापून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पाठविला.

चारा कापण्याची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ. बंकट आर्ले, सहआयुक्त डी. बी. डुबल, सरपंच विश्वनाथ गावंड, उपसरपंच जहिन्द्र पाटील, माजी सरपंच मंगेश पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.

श्रमदान करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, संघटक भगवान नाईक, कोषाध्यक्ष डॉ. राजू म्हात्रे, सरचिटणीस सुहास जोशी, डॉ. मेघा खवसकर, डॉ. रंजना लोखंडे, डॉ. अनघा म्हात्रे, डॉ. प्रवीण धुमाळ, डॉ. रवींद्र पाटील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य प्रतिनिधी वि. ह. तेंडुलकर, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, सहचिटणीस रत्नाकर देसाई, अलिबाग अध्यक्ष प्रणाली म्हात्रे, तलाठी अविनाश काटकर, संजय शिंगे, रिना म्हात्रे,  नीला देसाई, तसेच डॉ. बारवे, डॉ. बाजी,  डॉ. भुस्कुटे, सुरेश नाईक आदी अधिकारी-कर्मचारी व ढवर, नवे दरबेली उपस्थित होते.

जिल्ह्यातून माणगाव येथून 12 टन, अलिबाग 60 टन, पेण 15 टन, पोलादपूर 10 टन, मुरूड 10 टन असा एकूण 107 टन चारा व पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply