
खारघर : नगरसेविका अनिता पाटील यांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यु पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रूपम पाटील, वासुदेव पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते.
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते 25 हजार रुपयांची मदत

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नेहमीच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येत असते. अशाचप्रकारे दीपक धाडवे या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 25 हजार रुपयांची मदत नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते देण्यात आली.
पनवेल येथे रविवारी जयपूर फूट कॅम्प


पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जयपूर फूट कॅम्प घेण्यात आला. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अनिल कोळी आदी उपस्थित होते.