Saturday , June 3 2023
Breaking News

फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून मारहाण

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

अमन डेव्हलपरच्या उलवे सेक्टर 16मधील बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने अमानूष मारहाण करण्यात आली आहे. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक महावीर जाधव पुढील तपास करित आहेत.

मोठा खांदा येथे राहणारे उद्देश बामा टेंभे हे रिक्षा व्यवसाय करतात. त्यांचे सासरे काशीनाथ ठोकळ यांना सिडकोकडून साडेबारा टक्क्यात उलवे सेक्टर 16मध्ये प्लॉट नंबर ए/35 मिळाला असून त्यांनी मे. अमन डेव्हलपरमार्फत विकसित करण्यासाठी मनोजकुमार सिंग यांना दिला आहे. त्यातील एक फ्लॅट त्यांनी आपली मुलगी हेमांगी टेंबे  हिच्या नावावर केला आहे.हे बांधकाम डेव्हलपर लवकर पूर्ण ही करीत नाही आणि ठरल्याप्रमाणे भाडे देत नसल्याने हेमांगी यांचे पती उद्देश टेंभे सोमवारी (31 जानेवारी) सायंकाळी त्या ठिकाणी जाऊन कामाचे फोटो काढीत असताना पांढर्‍या रंगाच्या स्कारपीओ (एमएच 43-0575) मधुन आलेल्या काळे टी शर्ट व जीन्स, तोंडाला मास्क लावलेल्या सात ते आठ लोकांनी कामगारांना धमकी देतो का म्हणत हॉकी स्टिक व दांडक्यांनी मारहाण करीत गाडीत बसवून अमन बिल्डरच्या सीवूड्स सेक्टर 44 मधील कार्यालयात नेले.

या ठिकाणी मनोजकुमार सिंग याने त्यांना शिवीगाळ करीत फरफटत कार्यालयात नेले. पुन्हा मारहाण करून मोबाइलमधील फोटो डिलिट केले. खिशातील बटन कॅमेरा काढून फोडून टाकला. त्यानंतर 21 उठाबश्या काढायला लावून या पुढे साईटवर दिसल्यास गोळी घालण्याची धमकी दिली, अशी तक्रार न्हावा शेवापोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply