Breaking News

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने बांधल्या जवानांना राख्या

उरण ः वार्ताहर

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. त्यानिमित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण यांच्यातर्फे शुक्रवार (दि. 16) रोजी नौदल शस्त्रागारातील 80 जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. तुनीर येथील डीएससी सभागृहात सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कमांडर कौशिक कानुनगो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला सिक्युरीटी ऑफिसर लेफ्टनंट कमांडर कौशिक कानुनगो, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पनवेल केंद्राच्या प्रमुख तारादीदी, सुभेदार रमेश रोकडे, उरण केंद्राच्या सर्व बहेन रेश्मा, शोभा, प्रियंका, वर्षा, ऊर्मिला, रेखा गुंजवटे, मंजुळा म्हात्रे, मंजू सरोदे, मंजू चंद्रराव, समाजसेविका संगीता पवार, आयएनएस तुनिरचे जवान उपस्थित होते. रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply