रोटरी क्लबतर्फे रामशेठ ठाकूर यांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत या क्लबच्या माध्यमातून ‘रोटरी ऑगस्ट मेलोडीस’ या चॅरिटी शोचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 18) आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन लाखांची मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल, तसेच संग्राम द म्युझिकल मेडिकोस यांच्या मध्यमातून हॅप्पी स्कूल, गरीब व गरजूंसाठी कॅटरॅक्ट सजर्री, तसेच कोक्लियर इम्प्लांट प्रोजेक्टसाठी ‘रोटरी ऑगस्ट मेलोडिस’ या चॅरीटी शोचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमांमध्ये पनवेलमधील अनेकांनी मदत केली. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक जगदिश गायकवाड, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, डॉ. गुणे, डॉ. प्रकाश पाटील, हॅप्पी सिंग विलास कोडारे, उद्योजक जे. एम. म्हात्रे, रवी धोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.