Breaking News

स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व मला देवाने दिले!

विराट कोहलीच्या भावना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ’रनमशीन’ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सोमवारी (दि. 19) 11 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्याने पदार्पणाच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ’किशोर अवस्थेत असताना आजच्याच दिवशी 2008मध्ये प्रवासाला सुरुवात केली. जे मी स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व मला देवाने दिले,’ असे विराटने ट्विटमध्ये म्हटले आहे.

11 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. या प्रवासातील स्मृतींना त्याने ट्विटच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. 18 ऑगस्ट 2008 रोजी दांबुलामध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तो फोटोही त्याने ट्विट केला आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली सध्या भारतीय संघ विंडीज दौर्‍यावर आहे. भारताने ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिका जिंकली, तर कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान, कसोटी क्रमवारीत विराटने अव्वलस्थान कायम राखले आहे.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply