Breaking News

दोन खेळाडूंकडे टीम इंडियाचे नेतृत्व ; द. आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेसाठी अ संघ जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन संघ जाहीर केले आहेत. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. या मालिकेतून विजय शंकर संघात पुनरागमन

करणार आहे.

29 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या मालिकेतील भारत अ संघाचे पहिल्या तीन सामन्यांत पांडे, तर अखेरच्या दोन सामन्यांत अय्यर नेतृत्व सांभाळणार आहे. तिरुअनंतपुरम येथे होणार्‍या या मालिकेत भारत अ संघात शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुईस शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल आणि नितीश राणा यांचाही समावेश आहे. पांडेच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या संघात यष्टिरक्षक म्हणून इशान किशनला, तर अय्यरच्या संघात संजू सॅमसनला निवडण्यात आले आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी फिरकीपटू युजवेंद्र चहलही भारत अ संघाचा सदस्य असणार आहे. 29 आणि 31 ऑगस्ट, 2, 4 व 8 सप्टेंबर असे हे सामने होतील. या सामन्यांवर निवड समितीची नजर असणार आहे.

पहिल्या तीन वन डेसाठी संघ : मनीष पांडे ( कर्णधार), रुतूराज गायकवाड, शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, इशान किशन, विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर,

दीपक चहर, खलील अहमद, नितीश राणा.

अखेरच्या दोन वन डेसाठी संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), शुबमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, संजू सॅमसन, नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, इशार पोरेल.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply