Breaking News

स्मिथ तिसर्‍या कसोटीतून बाहेर

लंडन : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस 2019 मालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तिसर्‍या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाहेर झाला आहे. दुसर्‍या कसोटीत जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर खेळताना त्याच्या मानेवर चेंडू आदळला होता. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला हेडिंग्ले कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. दुसर्‍या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा, पण तो लगेचच बाद झाला. त्याने 92 धावांची खेळी केली, मात्र त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याच्या प्रकृतीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वैद्यकीय समिती लक्ष ठेवून होती. स्मिथने तिसर्‍या सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली जात होती, पण तो सामन्याच्या दिवसांपर्यंत पूर्णपणे बरा होणार नाही, याचा अंदाज आल्याने त्याला तिसर्‍या कसोटी सामन्यात न खेळवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (दि. 20) घेतला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply