Breaking News

कर्जत तालुक्यातील पाच सरपंचपदासाठी 35 अर्ज वैध; 13 अर्ज ठरले अवैध

सदस्य पदाच्या 53 जागांसाठी 215 अर्ज वैध

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यासाठी 16 ऑगस्ट हा नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी (दि. 19) दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली, त्यामध्ये 13 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. बुधवार (दि. 21) पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. कर्जत तालुक्यात सरपंच पदाच्या पाच जागांसाठी 35 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत, तर सार्वत्रिक निवडणूक असलेल्या पाच ग्रामपंचायतमधील सदस्य पदाच्या एकूण 57 जागांसाठी 227 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. सोमवारी (दि. 19) झालेल्या छाननीमध्ये सदस्य पदांसाठीची 215 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी 13 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. छाननीमध्ये ती सर्व वैध ठरली आहेत, तर 6 प्रभागातील 17 जागांसाठी 101 नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती, त्यामध्ये 98 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली. उमरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, ती सर्व वैध ठरली आहेत, तर 5 प्रभागातील 13 सदस्य पदांसाठी 50 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, त्यापैकी तीन नामनिर्देशन पत्रे अवैध ठरल्याने तेथे  47 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी सांगितले. वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी सात नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून, ती सर्व वैध ठरली आहेत. या ग्रामपंचायतीच्या 4 प्रभागातील 11 जागांसाठी 31 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती, त्यातील एक नामनिर्देशन पत्र छाननीत अवैध ठरल्याने तेथे 30 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी दिली. जामरुंगच्या थेट सरपंच पदासाठी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, ती सर्व वैध ठरली आहेत. या ग्रामपंचायतीच्या तीन  प्रभागातील सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी 20 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी चार नामनिर्देशन पत्रे अवैध, तर 16 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी सांगितले. रजपे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी सहा नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, ती सर्व वैध ठरली आहेत, तर 3 प्रभागातील सात जागांसाठी 25 पैकी 24 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.

ग्रामपंचायत आणि वैध अर्ज

नेरळ- थेट सरपंच 13, सदस्य- 17 जागांसाठी 98

उमरोली- थेट सरपंच 6; सदस्य-11 जागांसाठी 47

वाकस- थेट सरपंच 7; सदस्य-9 जागांसाठी 30

जामरुख- थेट सरपंच 3; सदस्य 7 जागांसाठी 16

रजपे- थेट सरपंच 6; सदस्य- 9 जागांसाठी 24

एकूण- थेट सरपंच 35 अर्ज; सदस्य 53 जागांसाठी 215 अर्ज

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply