Breaking News

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी

कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, पेणमधून सुमारे 100 बसेस गणेशोत्सवासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या संख्येत गणेशोत्सव होईपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत परिसरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावात आवर्जून हजेरी लावतात. यामुळे एसटी आणि कोकण रेल्वेवर अधिक ताण पडतो. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीकडून प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या काळात जादा बस सोडण्यात येतात. या वर्षीदेखील एसटीकडून ऑनलाईन बुकिंगची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. त्यानुसार फक्त पेणमधून जवळपास 100 बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत, तर मुंबई आणि इतर ठिकाणाहून कोकणात जाण्यासाठी एसटीच्या सुमारे  2500 बसेस आरक्षित झाल्या आहेत.

कोकणात जाताना पेण हे मध्यवर्ती ठिकाण असून, तेथून विविध बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. मुंबईवरून येणार्‍या प्रवाशांसाठी रायगड विभागातून 100 एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले असून रामवाडी, नागोठणे, महाड अशा तीन ठिकाणी बे्रक डाऊन गाड्यांसाठी दुरुस्ती पथक ठेवण्यात येणार आहे. 30, 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर या तीन दिवसात जास्त वाहतूक होणार असून या वेळी रात्रीच्या वेळी गस्तिपथकही ठेवण्यात येणार असल्याचे बारटक्के मॅडम यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी रायगड विभागातून 100 एसटी बसेस सोडण्यात येणार असून, तीन ठिकाणी बे्रकडाऊन गाड्यांसाठी दुरुस्ती पथक ठेवण्यात येणार आहे.

-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड एसटी

एसटीला सर्वाधिक पसंती एसटीतर्फे गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी नियमित आणि काही जादा बसेस उपलब्ध केल्या जात होत्या, मात्र या वेळी चाकरमान्यांना थेट गावापर्यंत बससेवा देण्यात येणार आहे. त्यातच गणेशोत्सवातील खाजगी वाहनांचे वाढीव दर, असुरक्षित प्रवास, रेल्वेमधील गर्दी आदी कारणास्तव प्रवाशांकडून एसटीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Check Also

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी …

Leave a Reply