अलिबाग : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सतीश धारप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली.
दक्षिण रायगड संघटनात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी जिल्हयातील काही प्रमुख पदाधिकार्यांच्या नियुक्त्या कोकणचे नेते रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आल्या. सतिशजी धारप यांची दक्षिण रायगड जिल्हा जिल्हा संघटन सरचिटणीसपदी, बीपीन म्हामुंणकर यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्षापदी, अमित घाग यांची भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अॅड. महेश मोहिते यांनी दिली.