नागोठणे : प्रतिनिधी
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 29व्या सिनियर राष्ट्रीय कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघटनेचा रसायनी येथील दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याने रौप्यपदक पटकाविले. त्याने रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
देविदासची जिद्द बघून रायगडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू भरत गुरव यांनी त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करून पुढील ट्रेनिगसाठी सांगली येथे दत्ता पाटील यांच्याकडे कॅनॉईंग अँड कयाकिंग हा खेळ शिकण्यासाठी पाठवले होते, अशी माहिती रायगड जिल्हा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग संघटनेचे सचिव संदीप गुरव यांनी दिली.