
कर्जत : प्रतिनिधी
अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या दहावीच्या 1981-82च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिरसे, तमनाथ व सांगवी येथील प्राथमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक आरओ वॉटर प्युरिफायर बसवून दिले तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले.
या शाळेच्या केंद्रप्रमुख तसेच आठवण-82च्या सहकारी प्रतिभा साळोखे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर शिरसे आणि सांगवी शाळेला आठवण 82च्या वतीने इलेक्ट्रीक आरओ वॉटर प्युरीफायर तसेच तमनाथ शाळेमध्ये वह्या वाटप करण्यात आले. या बॅचच्या पराग दातार यांच्या मातोश्री सरिता शरद दातार यांनी स्वखर्चाने शिरसे शाळेला प्रोजेक्टर व स्क्रीन भेट दिला. आठवण-82 बॅचने याआधी अभिनव ज्ञानमंदिर संस्थेला वर्गखोलीकरिता दोन लाख 51 हजारांची देणगी दिली होती. या बॅचच्या विद्यार्थिनी व उरणच्या नगरसेविका वर्षा देसाई, अनिल जोशी, पारस जैन, गजानन पाशिलकर, प्रकाश भुतकर, कल्पना ढमाले, सिमंतिनी शिंदे, राजश्री देशक, जयश्री संभुस, विनोद ओसवाल, पुरुषोत्तम वाणी, संदीप जोशी, पराग दातार, मनीषा दातार तसेच या शाळेच्या केंद्रप्रमुख प्रतिभा साळोखे, उपकेंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.