Breaking News

मतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले

कामोठे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची सनसनाटी घटना शनिवारी (दि. 27) कामोठ्यात घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शेकापसह महाआघाडीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचे बिंग फुटले आहे.

मावळ मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित मानला जातोय. परिणामी विरोधक बिथरले असून, त्यांनी मतदारांना आमिष दाखविण्याचा मार्ग अवलंबला आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेकापचे कामोठ्यातील कार्यकर्ते संदीप रामकृष्ण पराडकर आणि वैभव विठोबा पाटील हे सेक्टर 36 येथील सत्यकुंज कॉम्प्लेक्समध्ये मतदारांना पैसे वाटत होते. त्यांच्याकडे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादीही होती. या दोघांना भाजपचे कार्यकर्ते हॅप्पी सिंग, महेंद्र भोपी, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शेकापकडून मतदारांना प्रत्येकी 400 रुपये वाटप करण्यात येत होते. पकडण्यात आलेल्या संदीप पराडकर व वैभव पाटील यांच्याकडे 11,900 रुपये आढळून आले असून, ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात भादंवि 171 (इ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांना वाटप करण्यासाठी कुणी दिली याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply