Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांची ‘रोज बाजार’ला भेट

पनवेल : प्रतिनिधी

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या ठिकाणी असलेले खड्डे भरून घेण्यास आणि किरकोळ दुरुस्त्या तातडीने करून घेण्यास महापालिका अधिकार्‍यांना सांगितले.

पनवेल महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला गुरुवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, महापालिकेचे मुख्य अभियंता कठेकर आणि साळुंखे यांच्या समवेत भेट दिली. या वेळी तेथे असलेली अस्वच्छता, मध्येच साचलेले पाणी हे पाहून नाराजी व्यक्त केली. या वेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले.

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे  मुख्य अभियंता कठेकर यांना मार्केट मध्ये पडलेले खड्डे भरून घेण्याचे आणि बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून घेण्यास सांगितले. यानंतर त्यांनी तेथील विक्रेत्यांशी चर्चा करताना तीन महिन्यानंतर हा रोज बाजारजवळच असलेल्या दुसर्‍या

जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply