Breaking News

नव्या भारतात कुटुंबवादाला स्थान नाही

पंतप्रधानांचा निर्धार; फ्रान्समध्ये मुस्लिमांकडून भव्य स्वागत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर असून, शुक्रवारी (दि. 23) त्यांचा दौर्‍याचा दुसरा दिवस होता. या वेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधत आपल्या सरकारने केलेल्या कामांची तसेच मिळवलेल्या यशाची माहिती दिली. मी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे दिलेले वचन विसरत नाही, असा टोलाही या वेळी त्यांनी लगावला. आज नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्या प्रकारे या गोष्टींना थांबवले जात आहे ते आधी कधीच झाले नाही. नव्या भारतात थकणे आणि थांबण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी सांगितले.

नवे सरकार येऊन जास्त दिवस झाले नाहीत. फक्त 75 दिवस झाले आहेत. 100 दिवसही पूर्ण झाले नाहीत. या काळात सेलिब्रेशन सुरू असते. आम्ही मात्र त्या भानगडीत पडलो नाही. योग्य धोरणे आणि दिशेने जात आम्ही एकामागोमाग एक मोठे निर्णय घेतले, असे नरेंद्र मोदींनी या वेळी सांगितले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही भाष्य केले. तिहेरी तलाक एक अमानवीय कृत्य होते, पण आम्ही ते संपवून टाकले. महिलेचा सन्मान करणे गरजेचे आहे. तिहेरी तलाक रद्द केल्यामुळे मिळालेले कोट्यवधी महिलांचे आशीर्वाद भारताचे भले कऱणार आहेत. नव्या भारतात मुस्लिम महिलांसोबत होणारा अन्याय कसा स्वीकार केला असता, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या वेळी उपस्थित भारतीयांनी मोदी है तो मुमकीन है, अशा घोषणा दिल्या. त्यावर नरेंद्र मोदींनी ‘मोदी है तो मुमकीन है’मुळे नाही, तर देशातील जनतेने मतदान केल्यानेच हे शक्य झाले, असेही ठामपणे सांगितले.

भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लिम समाजाने केलेले हे स्वागत पाकिस्तानला पचले नाही. भारत सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार करणार्‍या पाकिस्तानच्या एका मंत्र्याने यासंदर्भात ट्विट करून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये फ्रान्समधील भारतीय मुस्लिम मोदींशी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्यक्तीने मोदींना तिरंगा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.

पाकचा जळफ ळाट

फ्रान्सच्या दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे जंगी स्वागत करण्यात आले. पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले. या वेळी भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply