Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश

खारघर : प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक आणि तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक जिंकले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक अजिंक्य भगत यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सचिव  डॉ. एस. टी. गडदे यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य के. के. म्हात्रे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कौतुक व अभिनंदन केले.पदकविजेते विद्यार्थी : सुवर्ण-अनुष्का शेळके (बारावी विज्ञान), अपूर्वा जाधव (अकरावी वाणिज्य),  दिव्या ठाकूर (अकरावी वाणिज्य), नेहा धोत्रे (अकरावी वाणिज्य),  प्रिंस स्वामी (अकरावी वाणिज्य), यश वास्कर (बारावी वाणिज्य), संचिता बागूल (बारावी विज्ञान); रौप्य-पूर्वा गायकर (अकरावी वाणिज्य), सूरज साहू (अकरावी वाणिज्य), जाकीर शेख (अकरावी विज्ञान).

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply