पनवेल ः विविध प्रकारची बतावणी करीत एका इसमास हातचलाखीने दोघा अज्ञात व्यक्तींनी लुटल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली आहे. कळंबोली सेक्टर 6 येथील शारदा सोेसायटीत राहणारे 53 वर्षीय बाळू बेंडकुले हे भाजी मार्केट येथे जात होते. त्यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्यासमोर आले व मला ओळखलेत का? असे बोलून त्यांना मिठी मारली व हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper