Breaking News

सिडको तारा केंद्रातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित गावांमधील प्रकल्पबाधित उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 1 मार्च, 2019पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात एअरलाईन रिझर्व्हेशन एजंट (रळीश्रळपश ठशीर्शीींरींळेप रसशपीं), एअरलाईन कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (रळीश्रळपश र्उीीीेांशी उरीश एुशर्लीींर्ळींश), एअरलाईन कार्गो एजंट (रळीश्रळपश उरीसे रसशपीं) या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

 या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन महिन्यांचा असून सदर प्रशिक्षण अभ्यासक्रम दि. 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्णांसाठी आर्थिक वर्ष 2019-20मध्ये अशा प्रकारचे साधारणत: 15 प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्याचा सिडकोचा मानस आहे. अभ्यासक्रमांसंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याकरिता सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, टॉवर नं. 5, प्लॅटफॉर्म स्तर, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, नवी मुंबई- 400 614 या पत्त्यावर भेट द्यावी किंवा 022-6105 4800, 6105 4801, 6105 4807 अथवा 6105 4455 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 

अभ्यासक्रमासाठीचे  प्रवेश अर्ज कार्यालयीन

कामकाजाच्या दिवशी विनामूल्य देण्याची व्यवस्था सिडकोमार्फत केली आहे. प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 मार्चपर्यंत सायं. 5.30 वा. स्वीकारले जातील.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply