महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील गांधारपाले येथील 54 पूरग्रस्त कुटुंबीयांना शिवसेनेच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. बिरवाडीमधील पूरग्रस्तांनाही मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी यावेळी सांगितले. महसूल विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. नागरिकांनी आपल्या बँक खात्यांची माहिती महसूल विभागाला देऊन सहकार्य करावे, जेणे करून मदत थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास मदत होईल, असे आवाहन विकास गोगावले यांनी यावेळी केले. जि. प. सदस्य जितेंद्र सावंत, महाड विधानसभा मतदारसंघ युवासेना सरचिटणीस विकी शिंदे इम्रान पठाण, राजू मांडे, विजय मालुसरे, राजूभाई नवले, महेश नवले आदी उपस्थित होते.