Breaking News

एसटी व लक्झरी बसचा अपघात

मुरुड : प्रतिनिधी

अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद येथील एका उतारावर सोमवारी (दि. 26) सायंकाळी लक्झरी व एसटी बसची धडक झाली. या अपघातात एसटीमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले.

ही एससटी बस मुरूड येथून कल्याणला जात होती. तर हंस लक्झरी बस मुंबईकडून मुरुडला येत होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काशीद जवळील एका उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लक्झरी बसने समोरुन येणार्‍या एसटीला धडक दिली. या अपघातात सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यात नांदगाव हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मेघा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. अपघातामध्ये लक्झरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. या बसचा पुढचा भाग दबला असून, खिडक्यांच्या काचासुद्धा फुटल्या आहेत. या घटनेचे वृत्त समजताच एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना इतर गाड्यामधून रवाना केले. या अपघाताची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply