
पनवेल : तालुका भाजप चिटणीस रमेश तुपे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रमेश तुपे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेविका सीताताई पाटील, सचिन खुडे, राजू केदारे, गणेश मांगुळकर, मधुकर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.