पनवेल : रामप्रहर वृत्त
सब का साथ, सब का विकास, या न्यायाने देशाची प्रगती साधणार्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम असून, खालापूर तालुक्यातील महड व हाळ येथील काँगे्रस, तसेच शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाची सर्वसमावेश विचारधारा आणि भक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे महड व हाळ येथील शेकाप कार्यकर्ते जयवंत खंडागळे, राजू खंडागळे, काँगे्रस कार्यकर्ते हसन राऊत यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, प्रवीण खंडागळे आदी उपस्थित होते.