कर्जत : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करून मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या, असे आवाहन प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सोमवारी (दि. 11) येथे केले.
मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत येथील रॉयल गार्डन सभागृहात सोमवारी इनरव्हील क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होेते.
मनाली लोहकरे हिने लसीचा पहिला डोस घेऊन लसीकरण शिबिराचा शुभारंभ केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स ज्योती वाव्हळ यांनी लसीकरण केले. त्यांना केवल वारीक, शाहीन मुजावर, प्रतिक्षा सिंग, विनायक पवार, रोहित मोरे यांनी सहकार्य केले. तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, रवींद्र माने, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, इनरव्हील क्लबच्या मोनिका बडेकर, प्राची चौडीए, उत्तरा वैद्य, पल्लवी सावंत, सरस्वती चौधरी, शिल्पा दगडे, सुलोचना गायकवाड, शीला गुप्ता, वनिता सोनी उपस्थित होत्या. ज्योत्स्ना शिंदे यांनी आभार मानले. 200 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. लसीकरण शिबिर सुरू होते त्या ठिकाणी एक परदेशी महिला सभा मोहंमद अलवान या आल्या व त्यांनी शिबिर आयोजकांना मलाही लस घ्यायची आहे, असे सांगितले. पासपोर्ट बघून आयोजकांनी त्यांचे लसीकरण केले.