Breaking News

सोनारी ग्रा. पं. निवडणुकीत शेकाप भुईसपाट झाला

जेएनपीटी : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महा आघाडीत सहभागी झालेल्या शेकापला एकही सदस्य निवडून न आणता आल्याने सोनारी ग्रामपंचायतमध्ये शेकाप भुईसपाट, अशी चर्चा सध्या राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 24 फेब्रुवारीला पार पडली. या निवडणुकीला शेकाप, शिवसेना (नारायण तांडेल गट) काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारे महाआघाडीचे उमेदवार विरोधात भाजप-शिवसेना (मेघश्याम कडू गट) अशाप्रकारे युतीचा सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजप युतीचा विजय झाला, तसेच महाआघाडीमधील मनसे, शिवसेनेचे एक-एक उमेदवार निवडून आले. एकंदरीत मागील रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकापचे उमेदवार तथा उरण पंचायत समितीचे विद्यमान सभापती नरेश घरत यांना सोनारी ग्रामपंचायत हद्दीत 534 मताधिक्य मिळाले होते. अशा प्रकारचे मताधिक्य मिळालेल्या आणि शेकापचा सरपंच असणार्‍या सोनारी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेकापच्या  उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागत असेल, तर येऊ घातलेल्या निवडणुकीत शेकापला आत्मचिंतनाची गरज आहे, अशी चर्चा सध्या राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply