Breaking News

160 जणांची मोफत आरोग्य तपासणी

मुरूड : प्रतिनिधी 

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मुरूड नगर परिषद आणि एमजीएम हॉस्पिटल (कामोठे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नगर परिषद सभागृहामध्ये बचत गट सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. श्रेय, डॉ. श्रुती, डॉ. निखिल, डॉ. योग्या, डॉ. श्वेता व डॉ. पथिक यांनी या शिबिरात बालकांची तसेच महिलांची तपासणी करून त्यांना औषधे मोफत दिली. जे रुण शासनाच्या योजनेत बसत असतील त्यांना यापुढील उपचार मोफत देण्यात येणार आहेत. उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, नगर परिषदेचे पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेविका मुग्धा जोशी, रेहाना शहाबंदर, मुख्याधिकारी अमित पंडित, संजीवनी आरोग्य सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, एमजीएमचे पीआरओ डॉ. योगेश पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.के.आरेकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नगर परिषद कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply